Wednesday, 25 March 2020

लॉकडाऊन- एक सुवर्णसंधी

अजून २१ दिवस लॉकडाऊन... आतापर्यंत मोठ्या आनंदाने उपभोगलेली सुट्टी आता जाचक वाटायला लागली ना? अजून एवढे दिवस घरी बसून काय करायचे असा गहन प्रश्न आहे सर्वांपुढे. कोरोनाचे भय आणि सामाजिक बांधिलकी यामुळे बाहेर तर पडता येणार नाहीये, त्यामुळे घरच्या घरीच विरंगुळा शोधावा लागणार आहे.
गेल्या काही दिवसात नेहमीच टीकेचे लक्ष्य झालेल्या Social sites, Netflix, Amazon Prime यांचे वजन आता चांगलेच वाढले आहे. Virtual Get-togathers, Serial binge watching, online games यांना उधाण आले आहे. FB, WhatsApp स्टेटस वर कुटुंबियांसोबत घालवलेल्या मजेदार क्षणांचे सेल्फीज पाहायला मिळत आहेत. कुणी मस्त चटकदार पदार्थ बनवतय, कुणी गाणी म्हणतय, कुणाचं योगा, कुणाचं पुस्तकवाचन सुरु आहे, कुणी छान चित्र/स्केच काढत आहेत, कॅरम, पत्ते यासारख्या खेळांना नवसंजीवनी मिळाली आहे.
आता आपल्याला अजून तीन आठवडे मिळाले आहेत. वेळेअभावी आतापर्यंत राहून गेलेल्या गोष्टी करण्याची, छंद जोपासायची, घरच्यांसोबत वेळ घालवायची नामी संधी!! घरात सर्वांसोबत कधी पुलंच्या पुस्तकांच अभिवाचन केलं आहे का? सर्वानी मिळून एकसूरात कधी ए. आर. रेहमान किंवा राहत फतेह अली खाऩ यांची गाणी आलाप घेऊन गाऊन पाहिली आहेत का? या छोट्या छोट्या गोष्टींनी पण खूप आनंद मिळतो. आपापले आनंदमार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. घरातील जुने अल्बम काढा, कपाटं आवरा, लेखन करा. Be Creative, अगदी TikTok video किंवा memes बनवले तरी चालतील. पण कार्यरत राहा. नुसते कोरोनाबद्दल msgs, TV channels आणि लॉकडाऊनच्या बातम्या पाहून उदास होऊन बसू नका. हि परिस्थिती पण कधी ना कधी निवळणारच आहे. परत एकदा रहाटगाडग्याला जुंपायचच आहे. त्यामुळे ह्या २१ दिवसांत पुढील २१ वर्ष पुरेल एवढी ऊर्जा मिळवायची आहे. चला तर मग लागा कमाला...
Stay at home, Be safe, Revitalise & Rejuvenate!
सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

वृषाली पाठक

Monday, 23 March 2020

Chloroquine- new corona treatment on the horizon?

Nowadays 'prevention is better than cure' has become a famous phrase. Looking at the global scenario of corona infection, we surely know the importance of prevention and prophylactic techniques but what about the cure? As the patients are increasing worldwide it's equally important to treat them. Of Course, there are WHO guidelines for patient management but those are symptom-specific measures; there is no definitive treatment against the novel corona virus (SARS CoV-2).
In the view of huge mortality and morbidity due to COVID-19, research and clinical trials are booming up with respect to the new effective compounds, antivirals, combination therapies, etc.
New drug development is very costly and highly time-consuming process. The compound has to undergo many stages before it comes to the market which includes pre-clinical studies, 3 phases of clinical trials, FDA approval. The whole R&D process easily takes 12 years and millions of dollars.
One promising approach to fast track the situation is 'repositioning/repurposing of drugs'. This simply means the reuse of already licensed drugs for new medical conditions. As the drug is already in use (for another illness), its side effects, pharmacological properties have been studied before. However, FDA approval has to be taken for use in new disease conditions.
Antimalarial drug Chloroquine is currently in limelight for its possible use in COVID-19 prevention. Since the 1950's it has been introduced in the clinical practice and widely used as a first-line treatment in malaria. Chloroquine (CQ) interferes with the malaria parasite metabolism and kills it. In case of SARS CoV-2, it seems to affect the entry of viruses in the host cell and ultimately slows down the rate of replication. Also, it helps to modulate severe immune reactions which otherwise can lead to organ failure. So it may not achieve the killing effect but can still cripple the virus and will be useful in flattening the infection curve.
Scientists are very positive about the use of CQ in control of current pandemic based on their research on other corona viruses. Whereas it still has to undergo many safety and efficacy checkpoints for its use in COVID-19 control.
Several clinical trials are going on in various countries including China, France, US, Norway, etc. Something will definitely come out of the turmoil. Let's hold on to this glimmer of hope!

©Vrushali Pathak (Ph.D.)

Friday, 20 March 2020

कहानी घर घर की...

"अगं बाळोबा ४ महिन्यांचा झाला, खिमटी द्यायला सुरुवात कर... " "पण डॉक्टरांनी ६ महिन्यांपर्यंत दुधाशिवाय काही द्यायचं नाही सांगितलं आहे" इति बाळाची आई. "केवढे लोकं आले होते हॉलवर, दृष्ट काढून टाका मनीची... " "दृष्ट बिष्ट असं काही नसतं ग" एकासूरात छोट्या मनीच्या आईबाबांच उत्तर. आजकाल असे दोन पिढ्यांमधले विसंवाद प्रत्येक गोकुळात ऐकायला मिळतात.
आजच्या आधुनिक आईबाबांना दृष्ट काढणे, करदोडा बांधणे, टिट लावणे या गोष्टी अजिबात पटत नाहित. पण नातवंडांना दुधावरच्या सायीसारखं जपणाऱ्या आजीआजोबांना कशातच कसूर ठेवायची नसते. बाळाला धूरी देणे, डोळ्यात काजळ घालणे, मध चाटवणे, बाळघुटी देणे या गोष्टी डॉक्टरांनीच नाही सांगितल्यामुळे नवीन आईबाप थोडीच ऐकणार आहेत मागच्या पिढीचं. अर्थात प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय करणं असतात. धूरी दिल्यामुळे श्वसनाचे रोग उद्भवू शकतात, काजळामध्ये केमिकल्स असू शकतात, हातात बांधलेले दोरे ओले राहिल्यास त्यात बॅक्टरीयाची वाढ होते आणि तेच जर चुकून तोंडात गेले तर इन्फेक्शन होऊ शकते. पण या गोष्टी जर नीट समजावून दिल्या तर वादंग खचितच टळेल.
याचा अर्थ असाही नाही की पूर्वीच्या सर्व रीती हानिकारकच होत्या. डॉक्टर त्यांच्या निरीक्षणांचे ठोकताळे बांधून सरसकट सर्वानाच लागू करतात. पण प्रत्येक बाळ, त्याची प्रकृती, त्याची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते. एका बाळाला आलेला अनुभव सर्वानाच येईल असं नाही. त्यामुळे इच्छेप्रमाणे, बेताने, अंदाज घेऊन काही गोष्टी केल्या तर खरच चालू शकते. वडीलधारी मंडळी बाळाच्या काळजीपोटी किंवा हितासाठीच तर सांगत असतात. त्यांच्या समाधानासाठी दृष्ट काढणे, पायात वाळे घालणे यासारख्या निरुपद्रवी गोष्टी केल्या तर बिघडते कुठे? प्रत्येक वेळी प्रॅक्टिकल विचार करण्यापेक्षा थोडं इमोशनल झालं तर काय हरकत आहे! दोन्ही पिढ्यांनी समन्वय साधून कुठेतरी सुवर्णमध्य गाठलाच पाहिजे तरच गोकूळ हसरे राहिल.😀😀 

वृषाली पाठक

Friday, 13 March 2020

कोरोनाची देणगी


कोविद १९ हा कोरोना फॅमिलीतला आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला व्हायरस. EBOLA, SARS, MERS या त्याच्या चुलतभावंडांबद्दल जास्त कुणाला माहिती नाही. फक्त नावाने ओळखून आहेत. MERS, ज्याचा मृत्युदर सर्वात जास्त आहे, त्याचं तर नाव पण कुणी ऐकलं नसेल.
या कोरोनाने जनमानसात खळबळ उडवून दिली आहे. TV मीडिया तर क्रिकेटची लाइव्ह कॉमेंट्री करावी तसा प्रत्येक क्षणाचा रिपोर्ट देतोय. एखाद्या डिटेक्टीव्हप्रमाणे कुठल्या विमानातून किंवा टॅक्सीतून व्हायरसचा प्रसार झाला तेही शोधून काढले जातेय. रोज नवीन आकडेवारी कानावर पडतेय. आज या शहरात एवढे रुग्ण आढळले; राज्यातील किंवा देशातील रुग्णांची संख्या इथवर पोहोचली वगैरे वगैरे... मागच्या दशकात झालेल्या Whatsapp च्या उदयामुळे जनजागृती आता प्रचंड वेगाने शक्य झाली आहे. Facebook, Whatsapp द्वारे अनाकलनीय माहिती शेअर होतेय. जेम्स बॉण्ड चित्रपटातील प्लॉट वाटाव्या अशा कोविदच्या जन्मकथा, अफवा, memes, आयुर्वेदिक उपचार, कोरोना आणि इतर सर्दीखोकल्याच्या लक्षणांमधला फरक, माहितीपर परिपत्रके, प्रतिबंधात्मक उपाययोजना अशा असंख्य गोष्टी वाचायला मिळत आहेत. कशावर विश्वास ठेवावा आणि काय आचरणात आणावे हेच समजत नाहीए. सर्वत्र सॅनिटायझर आणि मास्कचे panic buying सुरु आहे. अर्थातच यामध्ये काही चांगल्या गोष्टीपण आहेत ज्यामुळे मदतच होणार आहे. WHO ची वेबसाइट जर आपण बघितली तर जवळपास अर्ध पेज कोरोनाला अर्पण केलेलं आहे. अचूक माहिती आणि मार्गदर्शनासाठी ते जरूर पाहावे.
पण या सगळ्यामध्ये एकच बाब चांगली झालीये की आपण लोकांमध्ये सामाजिक स्वच्छतेबाबत जागरूकता आणू शकलो. एका meme मध्ये वाचलेलं कि यावर्षी कोरोनामुळे आपण हात धुवायला शिकलो; आणि हे तथ्य आहे अन्यथा किती लोकं वरचेवर सॅनिटायझर किंवा साबण लावून हाथ धुवायचे, किती लोकं समाजात वावरताना काळजी घ्यायचे? रस्त्यावर, गल्लीच्या कॉर्नरवर, लोकलमधून बाहेर पचापच थुंकणारे सवयीचे झालेले. आता थोडंसं खोकल तरी विचित्र नजरा झेलाव्या लागत आहेत. थोडक्यात म्हणजे आता लोकं शिष्टाचार पाळायला लागले आहेत. हे नव्याचे नऊ दिवस न राहोत हीच इच्छा.
हे नुकतेच आत्मसात केलेले Social Ethics आणि योग्य प्रतिबंधात्मक पाऊले याची सांगड घालून आपण नक्कीच कोरोना वर मात करू.
THANK YOU कोरोना.
तू तुझ्या वेगाने येशील आणि निघून जाशील, पण कायमचा लक्षात रहाशील.

वृषाली पाठक

Thursday, 5 March 2020

मलेरिया आख्यान भाग २- प्लाझ्मोडिअमचे जीवनचक्र

नमस्कार मंडळी🙏🏻
मागच्या भागात आपण पॅरासाईट, बॅक्टेरिआ आणि व्हायरस ह्यांच्यातील मूलभूत फरक बघितला. ह्या सर्वांची कार्यप्रणाली वेगवेगळी असते. व्हायरसप्रणित आजार खूप झपाट्याने पसरतात. जसा कोविद १९ व्हायरस जो आपल्या उंबरठयापर्यंत आलेला तो आता घरात घुसू पहातोय. यापूर्वीही सार्स, मार्स, एबोला अशा कोविद सदृश आजारांचा अचानक उद्रेक झाला होता आणि आपण त्यांना रोखण्यात यशस्वी झालेलो. कोविद १९ लाही आपण नक्कीच आळा घालू. पण संसर्गजन्य रोगांच्या दुनियेत काही अजार धावपट्टीवर असे चौकार षटकार न मारता राहुल द्रविड सारखे संयमित खेळी करत असतात. मलेरिया (पॅरासाईटजन्य), क्षयरोग म्हणजेच ट्युबरक्युलोसिस (बॅक्टेरिआजन्य) हे आजार माणसाच्या उत्क्रांतिपासून त्याच्या सोबत आहेत आणि अजूनही जगात 'Biggest Killer' म्हणून गणले जातात.
मागील भागात मलेरिया परजीवीची ओळख झालीच आहे, आता त्याच्या कार्यप्रणालीबद्दल पाहू.

भाग २: प्लाझ्मोडिअमचे जीवनचक्र

पहिल्या भागामध्ये आपण पाहिले की डास मलेरियाच्या परजीवींचे (प्लाझ्मोडिअमचे) वाहक असतात. माणसाला डास चावला की त्याच्या लाळेतून प्लाझ्मोडिअम पॅरासाईट्स शरीरात प्रवेश करतात. त्वचेतून रक्तवाहिन्यांमध्ये शिरतात आणि यकृतात म्हणजेच लिव्हर पेशींमध्ये बस्तान बसवतात. तिथेच भूमिगत होऊन विकसित होतात व काही दिवसांनी पेशीला नष्ट करून वेगळ्याच अवतारात बाहेर पडतात. वाहक डासामधून एक जरी पॅरासाईट लिव्हरपर्यंत पोहोचला तरी या एका पॅरासाईटपासून १५ दिवसात २०,००० नवीन पॅरासाईट्स तयार होऊ शकतात. हि सायलेंट स्टेज असते. आपल्याला काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. म्हणजे डास चावल्यानंतर साधारण १५-२० दिवसांनी अपल्याला मालेरिया झाल्याचे कळते.
लिव्हरमधून बाहेर पडले कि हे पॅरासाईट्स आपल्या रक्तातील लाल रक्तपेशींवर जोरदार आक्रमण करतात. आपल्या लाल रक्तपेशी हायजॅकच करतात म्हणा ना! पेशीतील हिमोग्लोबिन, प्रथिने, ऊर्जाघटके अशी यंत्रसामुग्री वापरून स्वतः विकसित होतात आणि शेवटी पेशीला फोडून बाहेर पडतात. एका लाल पेशीतून जवळपास १६-२४ नवीन पॅरासाईट्स बाहेर पडतात. हे बाहेर पडलेले पॅरासाईट्स परत नवीन लाल रक्तपेशी हेरून त्यावर हल्ला चढवतात. हे ३६-४८ तासांचे लाल रक्तपेशींचे चक्र सतत चालू राहते.
मलेरियाची जी विशिष्ट लक्षणे दिसतात; थंडी वाजून ताप भरणे, थकवा जाणवणे ती याच स्टेजमध्ये. प्रत्येक चक्राच्या शेवटी जेव्हा पॅरासाईट्स लाल रक्तपेशीतून बाहेर पडतात तेव्हा रोज विशिष्ठ वेळी ताप भरतो. प्रत्येक चक्राच्या वेळी काही प्रमाणात आपल्या लाल रक्तपेशी नष्ट होतात आणि त्यावेगाने शरीर नवीन पेशी निर्माण करू शकत नाही. त्यामुळे अॅनेमिया, कमी हिमोग्लोबीन अशी लक्षणे दिसू लागतात, प्लेटलेट्स कमी होतात. यावेळी जर उपाययोजना केली नाही तर परिणाम हानिकारक होऊ शकतात.
अशा मलेरिया झालेल्या व्यक्तीला जर डास चावला तर त्या व्यक्तीच्या शरीरातील काही पॅरासाईट्स डासामध्ये शिरतात आणि विकसित होऊन परत लाळेद्वारे नवीन व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करू शकतात. अशाप्रकारे दोन होस्ट मधून संक्रमित होत मलेरिया पॅरासाईट्सचे जीवनचक्र अखंड चालू राहते.

फोटो स्रोत- गुगल

मलेरिया पॅरासाईट्सच्या पाच जाती माणसाला संक्रमित करू शकतात.
१. प्लाझ्मोडिअम फॅलसिपॅरम
२. प्लाझ्मोडिअम व्हायवॅक्स
३. प्लाझ्मोडिअम मलेरी
४. प्लाझ्मोडिअम ओव्हेल
५. प्लाझ्मोडिअम नोलेसी

सर्वसाधारणपणे फॅलसिपॅरम आणि व्हायवॅक्सचे प्रमाण इतर तीन जातींपेक्षा जास्त आढळते. यापैकी प्लाझ्मोडिअम फॅलसिपॅरम फार भयानक. सर्वात जास्त मृत्यू या जातीमुळे होतात. फॅलसिपॅरम मलेरियामध्ये जर योग्य वेळी प्रतिबंध केला नाही तर खूप जास्त प्रमाणात लाल रक्तपेशी नष्ट होऊन महत्वाच्या इंद्रियांवर परिणाम होऊ शकतो. व्हायवॅक्स मलेरियामध्ये अशी गुंतागुंत सहसा होत नाही. हा सौम्य स्वरुपाचा असतो पण व्हायवॅक्स पॅरासाईट्स आपल्या लिव्हर मध्ये बरेच वर्ष सुप्तावस्थेत राहू शकतात. त्यामुळे रोगी बरा झाला तरी काही महिन्यांनी किंवा वर्षांनी हा आजार परत उद्भवू शकतो. मानवजातीचं नशीबच की हा गुणधर्म फॅलसिपॅरम पॅरासाईट्स मध्ये नाही, अन्यथा आपलं काही खरं नव्हतं!
पुढच्या भागात आपण या जीवघेण्या फॅलसिपॅरम मलेरियाबद्दल अधिक जाणून घेऊ.

वृषाली पाठक (Ph.D.)

इतिहासाचे साक्षीदार - एक्सप्रेसवे एडिशन

३ तासांचा प्रवास १६ तास लांबल्यावर जेव्हा अखेरीस घर जवळ येत तेव्हा पुलंच्या शैलीत "आपल्या पोटात एक चिमुकले भांडे आहे आणि त्यात जीव नावा...